Ad will apear here
Next
पंख
कथा या प्रामुख्याने कौटुंबिक चौकटीत लिहिलेल्या असतात; परंतु उर्मिला सिरूर यांच्या कथांमधून व्यापक विषय येतात. याची प्रचिती ‘पंख’ या कथासंग्रहातून येते. स्त्रीच्या बदलत्या जाणिवा, तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, स्त्रीचे समाधान हे या कथांमधून उमटते.

‘पारंबी’तून मोठा गोतावळा असलेल्या कुटुंबातील सुनेला पुराण वटवृक्षासारखे वाटणारे सासरे व त्यांचे वाढते कुटुंब याची गोष्ट सासूबाई सांगतात. विमानतळावर आलेल्या सुंदर महिलेवर खिळलेल्या प्रवाशांच्या नजरेचे दर्शन ‘दंश’मधून होते. ‘मजनूचे डोळे’मधून आशुतोष नावाच्या हिरोची ओळख होते. पती- पत्नी विभक्त झाल्यावर मिनोती व शम्मी या मुलींची होणारी फरफट ‘पंख’मध्ये व्यक्त होते.

सपनाच्या आगमनाने दोन्ही शेजारांमध्ये आनंद पसरतो; पण सपनाच्या रूपात आपली आजी परतली आहे, या विचाराने अस्वस्थ झालेल्या शेजीबाईला ‘मी तर सपना... फक्त सपना’ असे सांगून चिमुकली ‘सपना’तून आश्वस्त करते. मानवी जीवातील आनंद, दु:ख, घालमेल, अस्वस्थता, शांतता असे सर्व जाणिवा यातील सर्व कथांमधून जाणवतात.

पुस्तक : पंख
लेखक : उर्मिला सिरूर
प्रकाशक : इंकिंग इनोव्हेशन
पाने : ३०८
किंमत : ४५० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZPCBW
Similar Posts
कलायडोस्कोप व्यावसायिक कामासाठी जगभर फिरताना विविध अनुभव डॉ. प्रसाद मोडक यांना आले. वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्तीच्या व्यक्ती भेटल्या, या अनुभवावर त्यांनी ब्लॉगवर लेखन केले. यातील ४० लेखांचा संग्रह त्यांनी ‘कलायडोस्कोप’मधून वाचकांपुढे सादर केला आहे.
खा; पण प्रमाणात... कोणत्या वेळी, कोणत्या व्यक्तींनी कोणता आहार घ्यावा, यावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. वैशाली मंदार जोशी यांनी ‘काय खाऊ, किती खाऊ?’ हे पुस्तक लिहिले आहे. परीक्षार्थींनी काय खावे, काय टाळावे, उन्हाळ्यातील आहार आणि कोकणी मेवा, डाएटचे खूळ आदी गोष्टींवर यात भाष्य केले आहे. प्रत्येक पदार्थाचा स्वतःचा गुण असतो
ही व्यवस्था काय आहे? गंभीर आणि महत्त्वपूर्ण विषयांवर राजीव कालेलकर यांनी केलेले विचारप्रवृत्त करणारे हे लेखन. या पुस्तकातील लेखांमध्ये अपंगत्व, दलित, स्त्रीप्रश्न, मैत्री, संगीत, मार्क्सवाद, संस्कृती इत्यादींवर भाष्य केले आहे.
एन to पी : नोटबुक टू प्रिस्क्रिप्शन रुग्णांच्यादृष्टीने डॉक्टर देव असतात; पण त्यांच्याही आयुष्यात सर्वसामान्यांप्रमाणे सुख-दुःख, ताण-तणाव, आनंदाचे, संकटाचे किंवा आर्थिक अडचणींचे प्रसंग येत असतात. अशा प्रसंगांना डॉ. सोपान चौगुले यांनी ‘एन to पी (नोटबुक टू प्रिस्क्रिप्शन)’ या पुस्तकातून शब्दरूप दिले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language